मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तासाचे महत्त्व अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे आता प्रत्येक शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा व अनिवार्य करण्यात येणार असुन याबाबतचे नवीन क्रीडा धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
पूर्वी शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा होता मात्र आता प्रत्येक शाळेत क्रीडा तास हा अनिवार्य करण्याबाबत नवीन धोरण तयार करणार आहे.खेळांना प्रोत्साहन देणे हि महाराष्ट्र सरकारची महत्वाची भूमिका आहे.त्याचबरोबर लवकरच महाराष्ट्रात क्रीडा केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट आहे.विविध खात्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल तसेच राज्यातील रिक्त असलेली क्रीडा संकुल प्रमुखांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून या महिन्या अखेरपर्यंत भरले जातील असे आश्वासन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.