दरम्यान संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावरील आरोपावर बोलतांना म्हणाले की,आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे.बुलढाण्यात शिवसेनेकडून (ठाकरे) रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता मात्र अचानक आमच्या खासदारांचा (प्रतापराव जाधव) मिलिंद नार्वेकरांना फोन गेला आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो त्यानंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या.जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.गायकवाड पुढे म्हणाले,मला असे म्हणायचे आहे की आमच्या खासदारांनी आणि आमच्या संपर्क नेत्यांनी असे का वागावे ? तसेच भाजपा महायुतीतील आमदारांनी असे का वागावे ? संजय कुटेंच्या घरी जयश्री शेळके यांची बैठक झाली,माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहेत.भाजपाचा एकही कार्यकर्ता आमच्या बरोबर फिरला नाही.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक तर आमच्या विरोधात काम करत होते त्यामुळे ही लढाई आम्हाला एकट्यालाच लढावी लागली आणि जिंकली देखील.तिकीटच बदलले त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कुठे येतो ? त्यांना मी (प्रतापराव जाधवांना) नकोच होतो त्यांनी एकाही व्यक्तीला सांगितले नाही की मला मतदान करा असे आरोप संजय गायकवाड यांनी केला असून ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.