यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरातील कुंभारटेकडी परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी सपना रघुनाथ कुंभार ही शिवण क्लासला जाते असे सांगून घरा बाहेर गेली ती अद्याप परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी हरवल्याची माहीती दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहराला लागुन असलेल्या कुंभार टेकळी या परिसरात राहणारी सपना रघुनाथ कुंभार वय १८ वर्ष ही तरूणी तिचे वडील पाळधी तालुका धरणगाव येथे काही कामा निमित्ताने गेले असता रघुनाथ कुंभार यांच्या घरी त्यांची पत्नी मुलगा व मुलगी हे घरी असतांना त्यांची मोठी मुलगी सपना कुंभार वय १८ वर्ष हि दि. १५ शनिवार रोजी दुपारी १२ वाजता शिवण क्लासला जाते असे आईला सांगुन गेली परन्तु ती अद्याप परत आलीच नाही.सदरील तरूणीचे वडील हे दुपारी ३ वाजता बाहेरगावाहुन आल्यावर तिचे वडील,भाऊ यांनी तिच्या मैत्रीण नातेवाईक व इतर ठिकाणी तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नसल्याने अखेर आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी तरूणीचे वडील रघुनाथ चावदस कुंभार वय ४१ वर्ष राहणार कुंभार टेकडी यावल यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये खबर दिल्याने तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालक बाऱ्हे हे करीत आहे.