Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Saturday, August 16, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

शिवीगाळीचा नियम मोडला !! सौंदाळा ग्रामपंचायतीकडून दोघांवर दंडात्मक कारवाई !!

कौतुकास्पद कामगिरी विशेषमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Dec 4, 2024 0

राहाता-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ डिसेंबर २४ बुधवार

शेतीच्या बांधावरून वाद झाले तेव्हा दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्याबद्दल सौंदाळा ग्रामपंचायतने दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे तर एकमेकांना शिव्या देणाऱ्या दोघांनीही शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला आहे.

नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावात नुकताच झालेल्या ग्रामसभा ठराव अन्वये शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्यात यावा त्यानुसार एकमेकांना शिविगाळ करणाऱ्या सदर दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.सौंदाळा गावचा शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्याचा ठराव सोशल मिडिया व वर्तमान पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे त्यानंतर ग्रामपंचायतने केलेल्या दंडास महत्व प्राप्त झाल आहे.सौंदाळा गावातील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या.सकाळी सरपंच शरद आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे करण्याचे सांगून वाद मिटवला.यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला.ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांधभाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्याचे सांगितले.दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचे ठकाजी व शांताराम यांनी म्हंटले आहे.यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधित भरणार असून सदरच्या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे म्हणून फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचे सांगितले.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

उद्या फडणवीसांबरोबर कोण कोण शपथ घेणार ? !! नव्या सरकारच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी !!

Next Post

“महायुतीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही” !! ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका !!

You might also like More from author
कौतुकास्पद कामगिरी विशेष

डोंगर कठोरा ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील गौरव प्रमाणपत्राने सन्मानित !!

स्तुत्य उपक्रम विशेष

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार…

महाराष्ट्र विशेष

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगास मंत्रीमंडळाची मान्यता-भाजप राज्य अनुसुचित…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल महाविद्यालयात रसायन विभागातर्फे पोस्टर स्पर्धा संपन्न !! हर्षल महाजन प्रथम तर भाग्यश्री चौधरी द्वितीय !!
  • निंबोल येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण !!
  • जामनेरमध्ये सलग दोन गंभीर घटना तरीही मंत्री गिरीश महाजन गप्प का ? भीम आर्मी भारत एकता मिशनचा सवाल !!
  • उत्राण येथील २०० विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे मोफत अपघाती विमा कवचाचे संरक्षण !!
  • यावल महाजन इंग्लिश स्कुलमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.