यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायततर्फे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व तलाठी यांचे उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने आज दि.६ डिसेंबर शुक्रवार रोजी ज्ञानाचा अथांग महासागर,राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिन ( पुण्यतीथी ) निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस माल्यांर्पण करून अभीवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सदर अभिवादन कार्यक्रम प्रसंगी सरपंच नवाज तडवी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यांर्पण करून अभीवादन करण्यात आले.यावेळी सरपंच नवाज तडवी, ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,तलाठी गजानन पाटील,ग्रामांचायत सदस्य दिलीप तायडे,जुम्मा तडवी,कोतवाल विजय आढाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते.