यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.०६ डिसेंबर शुक्रवार रोजी तालुक्यातील आमोदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच,उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
आज ६ डिसेंबर रोजी ज्ञानाच्या अथांग महासागर राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिन ( पुण्यतीथी ) या निमित्ताने अभीवादन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच श्रीमती जुगराबी लतीब तडवी,ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे,पोलीस पाटील तुषार चौधरी,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार पाटील,हेमराज पाटील,आमोदा ग्रामपंचायत अधिकारी गौतम तायडे,संजू तडवी व उपस्थित सन्माननीय ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रसंगी ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटावरील माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन गौतम तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.