डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि.०६ डिसेंबर शुक्रवार रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यपाल सी.पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे प्रमुख उपस्थितीत चैत्यभूमी,दादर येथे ज्ञानाचा अथांग महासागर,राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिन ( पुण्यतीथी ) निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर विनम्र अभिवादन करण्यात आले.