पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सचिन यादवचे दीड वर्षांपासून सख्ख्या चुलत बहिणीसोबत प्रेम संबंध होते व हे त्यांच्या कुटुंबाला आवडत नव्हते तसेच त्यांचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता.प्रेयसी चुलत बहीण ही कुटुंबाला सोडून सचिन राहत असलेल्या दिघीतील रूमपासून काही अंतरावर राहण्यास गेली होती यावरून देखील त्यांच्या कुटुंबात रोष होता.दरम्यान काल (दि.०५ डिसेंबर) गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गौतमने त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघीतील सचिन यादवच्या रूमवर गेला व तिथे त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून गौतमने सचिनवर कोयत्याने सपासप वार केले.सदर घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.सदरहू घटनेनंतर गौतम यादव आणि त्याचा अल्पवयीन मित्र फरार झाला होता.यात काही तासातच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने गौतमला काळा खडक तर अल्पवयीन मुलाला मावळमधून ताब्यात घेतले असून त्या दोघांवर खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.