Just another WordPress site

स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सवानिमित्ताने आजपासून १७ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

दि.१० डिसेंबर २४ मंगळवार

शहरातील दूरदर्शन टॉवर भुसावळ रोडवरील श्री स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सव हा आजपासून दि.१० डिसेंबर ते १७ डिसेंबर २४ या कालावधीत संपन्न होणार आहे.सदरहू सदरील वाहतूक मार्गावर मा.जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जरी केलेल्या १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम,कलम ३३ (१)(बी) नुसार जळगाव जिल्ह्यातील पुढील ठिकाणी आणि वेळी फक्त अवजड आव्हनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दि.१० डिसेंबर ते १७ डिसेंबर २४ पर्यंत सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपावेतो पुढीलप्रमाणे मार्गात बदल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे असे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा जळगाव यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

अवजड वाहनांकरिता वाहतूक मार्गात करण्यात आलेला बदल पुढील प्रमाणे आहे.

१) भुसावळ कडून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग हा नाहाटा कॉलेज-जामनेर-नेरी-वावडदा-म्हसावद-एरंडोल मार्गे वळविण्यात आलेली आहेत.

२) भुसावळ कडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग हा नाहाटा कॉलेज-जामनेर-नेरी-अजिंठा चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत.

३) धुळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणारी वाहनांकरिता पर्यायी मार्ग हा एरंडोल-म्हसावद-वावडदा-नेरी-जामनेर मार्गे वळविण्यात आलेली आहे

४) जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग अजिंठा चौक-नेरी-जामनेर मार्गे वळविण्यात आलेली आहेत.

तरी संबंधित वाहनधारकांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता करण्यात आलेल्या वाहतूक बदलाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव प्रतिष्ठा महोत्सवासाठी ची जाहीर सूचना
आज दि.१० डिसेंबर २४ मंगळवार दुपारी एक वाजेला डोंगर कठोरा (ता.यावल) येथून सरकारी नियमाप्रमाणे तिकीट भरून जळगाव स्वातंत्र्य चौक दिंडी सोहळ्यासाठी बस सेवा ठेवण्यात आलेली आहे व संध्याकाळी कार्यक्रम आटोपल्यानंतर सात वाजेला परतीचा प्रवास डोंगर कठोरा गावापर्यंतचा असणार आहे तरी ज्या हरिभक्तांना या बस सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपापल्या गावच्या मंदिरामध्ये संपर्क करावा.

दि.११ डिसेंबर ते १७ डिसेंबर २४ या कालावधीतपर्यंत पूर्ण सात दिवस सुद्धा वरील सांगितल्याप्रमाणे तिकीट भरून आपापल्या गावावरून स्पेशल जळगाव कार्यक्रमापर्यंतच्या बस सेवेचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा व गावातील मंदिरामध्ये संपर्क करावा.श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव बस सेवा मार्ग

लिस्टमध्ये असलेले प्रथम गाव त्या गावावरून सकाळी सात वाजेला बस सेवा सुरू होणार आहेत.अनुक्रमाने स्वतःच्या गावाला बस येईल त्याप्रमाणे बस स्टॅन्ड वरती सर्वांनी हजर राहावे.

१ मार्ग-मोहराळा ते कोरपावली-यावल-भुसावळ ते जळगाव

२ मार्ग-सातोद-कोळवद-कठोरा-सांगवी-भालोद-चिखली-जळगाव

३ मार्ग-न्हावी-फैजपुर-बामणोद-पाडळसा -भुसावळ-जळगाव तसेच जळगाव वरून पुन्हा पार्टीसाठी संध्याकाळी ७ वा त्याच मार्गाने मार्गक्रमण करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.