सोमनाथ सूर्यवंशीबरोबर काय घडले ?

१० डिसेंबर रोजी सोपान पवार या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची कथितपणे विटंबना केली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी निदर्शने आणि दगडफेक झाली.परभणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून सोमनाथ सूर्यवंशी याच्यासह ५० जणांना अटक केली होती.सोमनाथ सूर्यवंशीला १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि १४ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले त्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिकांनी असा आरोप केला की,पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात काम करणाऱ्या वचला मानवते नावाच्या महिलेला मारहाण केली व ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.असे असले तरी पोलिसांनी हे आरोप नाकारले आहेत याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.हिंसाचारानंतर लगेचच दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा आरोपही करण्यात येत आहेत.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,कायद्यानुसार आरोपांची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणी एक्सवर पोस्ट केली आहे.आपल्या पोस्टमध्ये आंबेडकर म्हणाले की, “परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू झाला आहे व त्याचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्याचा मृत्यू झाला यापेक्षा असह्य काय असू शकते.”