Just another WordPress site

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू !! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार

मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली व या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती मात्र या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली.या बोटेतून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते.ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले यावेळी नौदलाने या बोटीमधील १०१ प्रवाशांना सुरक्षित वाचवले तर या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे.यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर,११ नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

“मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या घटनेत सायं.७.३० पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी १०१ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत.या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत तसेच २ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल,कोस्टगार्ड,मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले.या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली.अद्यापही शोधकार्य सुरुच आहे त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल.मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे.

अपघातानंतर प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आले त्यापैकी एका प्रवाशाने सांगितले,आमची बोट पाच ते सात किमी समुद्रात होती त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो.एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती.ही स्पीड बोट आम्हाला धडकू शकते अशी भीती मला वाटली.नेमके घडलेही तसेच व ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली.त्यावेळी स्पीडबोटमधल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा पाय कापला गेला.रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या जखमी प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आले.स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरु लागले आणि बोट बुडू लागली अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे.एबीपी माझा या वाहिनीशी बोलतांना ही माहिती त्याने दिली आहे.

                      १३ जणांचा जीव घेणाऱ्या फेरी बोट अपघातामागचे कारण काय ? मुंबईच्या समुद्रात घडली भीषण दुर्घटना !!

mumbai boat news

मुंबईजवळच्या समुद्रात एलिफंटाच्या दिशेने संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने ही दुर्घटना घडली.नौदलाच्या एका स्पीडबोटने या प्रवासी बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.या अपघाताचे प्रवासी बोटीतील प्रवाशांनीच काढलेले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.त्या व्हिडीओ मध्ये नौदलाची स्पीडबोट थेट प्रवासी बोटीला येऊन धडकल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नौदलाच्या स्पीडबोटीमुळेच हा अपघात झाल्याचे स्पष्ट असून ही बोट या प्रवासी बोटीला कशी धडकली ? यासंदर्भात सखोल चौकशी केली जात आहे.नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,या स्पीडबोटवर नवे इंजिन लावण्यात आले होते व त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ही बोट प्रवासी बोटीवर आदळली.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संध्याकाळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान उल्लेख केला.यासंदर्भात सखोल तपास करण्यासाठी नौदलाकडून एका समितीची स्थापना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

नव्या इंजिनाची चाचणी

इंजिन बदलासारखा मोठा बदल जेव्हा आम्ही स्पीडबोटमध्ये करतो तेव्हा त्याची सर्व निकषांनुसार काटेकोरपणे चाचणी घेतली जाते यावेळी संबंधित इंजिन उत्पादित करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधीही आमच्यासोबत असतात.उदाहरणार्थ जर उत्पादक कंपनीने दावा केला की ते इंजिन १४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा गाठू शकते तर त्यांना सोबत घेऊन आम्ही ती बोट तेवढी वेगमर्यादा गाठते की नाही याची चाचणी करतो त्याचप्रकारची चाचणी बुधवारीही केली जात होती असे नौदलाच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार,अपघातग्रस्त स्पीडबोटवर नवीन इंजिन बसवल्यानंतर तिची चाचणी घेताना बोटीवर सहाजण होते व यात उत्पादक कंपनीच्या चार प्रतिनिधींचाही समावेश होता.चाचणी सुरू झाल्यानंतर बोटचालकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि बोट नीलकमल या प्रवासी बोटीला जाऊन धडकली.यासंदर्भात मुंबई पोलिसांनी बोटचालकासह बोटीवर असणाऱ्या सर्व सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंजिन उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींचा मृत्यू

या बोटीमध्ये उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते.चाचणीवेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्र सिंग शेखावत व उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.त्याव्यतिरिक्त एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून इतर दोघांवर किरकोळ उपचार चालू आहेत अशीही माहिती समोर आली आहे.ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नौदलाची स्पीडबोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.नाथाराम चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला होता.तेच या प्रकरणातील तक्रारदार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

                                            ‘नीलकमल’ बोटीला नौदलाची स्पीडबोट धडकली तो क्षण कॅमेऱ्यात कैद

          Mumbai Boat Accident Video
मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृ्त्यू झाला आहे.नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवाशी बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे.उशीरापर्यंत या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते.हा अपघात झाल्यानंतर आता या धडकेचा व्हिडीओ समोर आला आहे.

१३ जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेत दोन बोटींची धडक झाली तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एक छोटी स्पीडबोट पाण्यात ४-५ प्रवाशांना घेऊन जातामा दिसत आहे.ती बोट काही अंतरावरून यू-टर्न घेते आणि वेगाने प्रवासी बोटीकडे येते.शेवटच्या क्षणी दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न होतो पण दोन्हींची धडक होते.या धडकेनंतरच प्रवासी बोट बुडण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की,अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.नौदलाचे व्हाइस अॅडमिरल संजय जगजीतसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडे सातपर्यंत १३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहेत तर १० नागरिक आहेत.दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नौदल,कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले मात्र या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला याबद्दलची आकडेवारी उद्यापर्यंत उपलब्ध होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहे.मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.