राम शिंदे यांची विधान परिषद सभापती बिनविरोध निवड !! “राम शिंदे सर,क्लास कसा चालवायचा हे…” !! विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार
विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजपचे राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.विधान परिषदेचे सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला व याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी,शिवाजी गर्जे,ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपती एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो,आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींती निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधा पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो.फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की,“प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे यापूर्वी देखील ना.स.फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला.मला विश्वास आहे की आपणही तसेच अतिशय शिस्तीने पण संवेदनशीलतेने सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही”.