Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, August 15, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या !! सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक !!

क्राईममहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Dec 30, 2024 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० डिसेंबर २४ सोमवार

शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे ऊर्फ मन्या (३०) या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.दारूच्या नशेत आरोपीने हा प्रकार केल्याचे चौकशीत सांगितले आहे.पोलीस त्या दाव्याची पडताळणी करत आहेत.

दरम्यान शिवाजी पार्क येथील रुक्मिणी सदन इमारतीच्या पदपथावर शुक्रवारी बेवारस मृतदेह सापडला होता.पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले.याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.प्राथमिक तपासणीत मृत व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मृत व्यक्तीचे नाव चंदन असल्याचे समजले.सीसीटीव्हीच्या तपासणीत मृत व्यक्ती चंदनसोबत एक तरुण व्यक्ती दिसला.मृत व्यक्तीसोबत असणाऱ्या तरुणाचे नाव मनोज सहारे ऊर्फ मन्या असून तो कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे पोलिसांना समजले.शोध घेतला असता माहीम येथील मनमाला मंदिराजवळ सीसीटीव्ही चित्रीकरणातील व्यक्तीशी साधर्म्य असलेला व्यक्ती सापडला.त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव मनोज सहारे असल्याचे सांगितले.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपी मनोज हा शिवाजी पार्क येथील बंगाल क्लब येथील पदपथावर राहतो.आरोपीने दगडाने ठेचून चंदनची हत्या केली.हत्येत वापरलेला दगड पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

“अजित पवार २० हजार मतांनी पराभूत तर महायुतीला फक्त १०७ जागा” !! आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा !!

Next Post

“चला व्यसन बदनाम करूया अभियान” !! महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचा अभिनव उपक्रम !!

You might also like More from author
स्तुत्य उपक्रम विशेष

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार…

क्राईम

चोरावर मोर !! शिर्डी येथील फायन्सास कंपनीकडून ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणात…

क्राईम

चिंचोली येथील हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल !! जिल्हा…

क्राईम

निंबादेवी धरण मार्गावरील मोटरसायकलच्या भिषण अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी !!

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • डोंगर कठोरा ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील गौरव प्रमाणपत्राने सन्मानित !!
  • स्तुत्य उपक्रम : जावळे येथील मंगल कार्यालय परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण !!
  • डोंगर कठोरा येथे स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा !!
  • “आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन !! १५ ऑगस्ट रोजीचे आमरण उपोषण स्थगित !!
  • अवयव दान हे श्रेष्ट दान असुन अवयव दानातुन ती पुन्हा जिवंत राहू शकते !! जागतिक अवयवदान दिनानिमित्त गुरूजनांनी व्यक्त केल्या भावना !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.