त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या एक्स अकाऊंटवर कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे.या पोस्टमध्ये म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच त्यांनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे असे महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान थोड्यावेळापूर्वीच माध्यमांशी बोलत असतांना सुरेश धस यांना महिला आयोग आणि प्राजक्ता माळी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.माझ्यासाठी हा विषय संपला असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.