Just another WordPress site

संपत्तीच्या वादातून पत्रकाराच्या कुटुंबाची निर्घृण हत्या !! आई,वडील,भावावर कुऱ्हाडीने वार !! कुटुंबातील तीन जणांच्या निर्घृण हत्याकांडाने खळबळ !!

रायपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.११ जानेवारी २५ शनिवार

पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आणखी एका पत्रकाराच्या कुटुंबाच्या हत्येचे प्रकरण समोर आले असून छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये काल शुक्रवारी संपत्तीच्या वादातून पत्रकार संतोष कुमार टोपो यांच्या कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पत्रकार संतोष टोपो यांच्या आई,वडील आणि भावाची हत्या करण्यात आली असून सदरील घटना काल शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली त्यावेळी संतोष टोपो यांचे आई,वडील जगन्नाथपूरमधील खरगवातील शेतात काम करत होते.संतोष यांचे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये बऱ्याच कालावधीपासून संपत्तीवरुन वाद सुरु होता.

संतोषचे कुटुंबीय आणि त्यांचे काका यांच्यात वाद झाला.या वादाने टोक गाठले त्यानंतर काकाने संतोषच्या आई,वडिलांवर धारदार हत्याराने हल्ला केला त्यात संतोष टोपो यांच्या आई,वडिलांचा जागीच मृत्यू झाला.आरोपीने अतिशय निर्घृणपणे त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.संतोष यांचे काका आणि अन्य संशयित नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे.जगन्नाथपूर गावात टोपो कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन आहे त्यावरुन एकाच कुटुंबातील दोन गटांमध्ये वाद झाला.नरेश टोपो (३०) त्यांची आई बसंती टोपो (५५) आणि वडील माघे टोपो (५७) यांच्यासह वादग्रस्त जमिनीवर शेती करण्यास गेले होते त्यावेळी दुपारी एकच्या सुमारास माघे टोपो यांच्या कुटुंबातील ६ ते ७ जण तिकडे पोहोचले.शेती करण्यावरुन परिवारातील दोन गटांमध्ये वाद झाला.काही वेळातच भांडणाला हिंसक वळण लागले.माघे टोपो यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि काठ्यांनी हल्ला केला.डोक्याला गंभीर इजा झाल्याने बसंती टोपो आणि नरेश टोपो यांचा जागीच मृत्यू झाला.माघे टोपो यांनी गंभीर अवस्थेत अंबिकापूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.माघे यांचा दुसरा मुलगा उमेश टोपोने घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.

Leave A Reply

Your email address will not be published.