“सैफच्या मणक्यात अडीच इंचाचे चाकूचे टोक अडकले होते !! दोन शस्त्रक्रिया केल्या” !! अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सखोल माहिती !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याला रुग्णालयात दाखल केले.सुरुवातीला त्याला खोल जखमा झाल्याचे वृत्त समोर आले होते त्यानुसार त्याच्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली व या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ.नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला.लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर माध्यमांना म्हणाले,“सैफ अली खानवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी झाली आहे व त्यांना ऑपरेशन थिएटरमधून त्यांना आयसीयूत शिफ्ट केले आहे.एक दिवस त्यांचे निरिक्षण केले जाईल.ते सध्या स्थिर आहेत.ते लवकरच रिकव्हर होतील. त्यांना २ खोल जखमा आहेत.दोन किरकोळ जखमा आहेत.अडीच इंचाचे चाकूचे टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आला आहे.”त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या मज्जातंतूतज्ज्ञ डॉ.नितीन डांगे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,“मध्यरात्री २ च्या सुमारास सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी होते.त्यांच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला आहे.लिकिंग स्पायनल फ्लुएडवरही उपचार करण्यात आले.डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले व त्यांची प्रकृती आता पूर्णता स्थिर आहे.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहेत.”
दरम्यान मज्जातंतूतज्ज्ञ डॉ.नितीन डांगे,सुघटनशल्य चिकित्सक डॉ.लीना जैन,भूलतज्ज्ञ डॉ.निशा गांधी,डॉ.नीरज उत्तमनी यांनी सैफ अली खान यांच्यावर उपचार केले. सैफला सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे.अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम) येथील घरात दरोडेखोराने हल्ला केला ज्यात सैफ गंभीर जखमी झाला.लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.हल्ल्याच्या वेळी करीना आणि मुले घरी होती.सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोराने त्याच्यावर हल्ला केला.इब्राहिम आणि कुणाल खेमूने सैफला रुग्णालयात नेले.पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले… !!
डॉ.नीरज उत्तमणी म्हणाले,“सैफला सहा जखमा झाल्या आहेत त्यापैकी दोन जखमा खोल आहेत.एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे.आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत” असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमणी म्हणाले होते.अडीच तासांनी ही शस्त्रक्रिया पार पडली न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल असेही डॉ.उत्तमणी यांनी सांगितले.
“सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग?”, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली गंभीर शंका !!
जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कट्टरतावादी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे सैफवर चोराने हल्ला केला असल्याचे सांगितले जात असतांना या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.आव्हाड त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की,“सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे”
.
“हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे हे विशेष!” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.