दूध भेसळीविरोधात राज्यभर सर्वेक्षण !! पिशवीबंद दुधाच्या ६८० व सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांची तपासणी !!
दरम्यान दुधाचे नमुने भेसळ,रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.या नमुन्यांच्या विश्लेषणानंतर दुधात भेसळ असल्याचे आढळल्यास संबंधित उत्पादक आणि पुरवठादारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदत क्रमांक १८००२२२३६५ वर त्वरित संपर्क साधावा किंवा ई-मेल jc- foodhq@gov. in वर किंवा https:// foscos. fssai. gov. in/ consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन राजेश नार्वेकर यांनी केले आहे.दुधातील भेसळ ही गंभीर समस्या असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री,विभागाचे मंत्री व राज्यमंत्री यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेत भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.त्याअनुषंगाने राज्यभरात दुधाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली तसेच अशा प्रकारची मोहीम वारंवार राबविण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नमूद केले आहे.