मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला.हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आले आहे.या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर जबरदस्तीने किंवा कुठलीही मोडतोड न करताना घरात घुसल्याचे दिसून आले आहे.हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने सैफवर चाकूने सहा वार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.सैफच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे हल्लेखोराचा घरात जातांना किंवा तिथून पळून जातांनाचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही.मात्र इमारतीच्या पायऱ्यांजवळील एका कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला असून या व्हिडीओच्या मदतीने पोलीस आता हल्लेखोराचा तपास करत आहेत.
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आले आहे.पोलिसांनी या आरोपीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्यामुळे हल्लेखोराला पकडल्याचे बोलले जात आहे मात्र पोलिसांनी सध्या यावर भाष्य करण टाळले आहे.पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत जोवर तोच हल्लेखोर आहे हे स्पष्ट होत नाही तोवर काही माहिती जाहीर केली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची २० पथके तयार करण्यात आली आहेत.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही मुंबई पोलिसांची माहिती !!
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही अशी माहिती मुंबई दिली आहे.आज सकाळी एका संशयिताची चौकशी करण्यात आली होती तेव्हा काही माध्यमांनी ‘एक आरोपी अटकेत’,‘एक आरोपी ताब्यात’ अशा बातम्या प्रसिद्ध केल्या त्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.हल्लेखोराला पकडण्यासाठी आणची वेगवेगळी पथके अथक प्रयत्न करत आहेत.
सैफ अली खानच्या भेटीसाठी आशिष शेलार रुग्णालयात !!
सैफ अली खानच्या भेटीसाठी मंत्री आशिष शेलार गुरुवारी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल झाले.रुग्णालयात जाऊन त्यांनी सैफच्या कुटुंबियांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.शेलार म्हणाले,आयसीयूमध्ये अभिनेते सैफ अली खान यांना बघून आलो ते आराम करत आहेत.त्यांच्यावर सहा वार त्यांच्यावर झाले होते.दोन जखमा खोलवर झाल्या होत्या.जवळजवळ पाच तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.आपण सर्वजण मिळून प्रार्थना करुया की ते लवकरात लवकर बरे व्हावेत.मी सकाळपासून पोलिसांच्या संपर्कात आहे,जो आरोपी आहे त्याला पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे.पोलिसांची १० पथके आरोपीच्या शोधात आहेत.सैफ अली खान यांना सध्या विश्रांतीची गरज आहे.मुंबई सगळ्यात सुरक्षित शहर आहे,वांद्रेवासियांनी घाबरुन जाऊ नये असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.