पुणे शहरात मेफेड्रोनसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत दिले.शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे.बेशिस्त वाहनचालक तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश कदम यांनी दिले.शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवावी तसेच गुटखा,अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश त्यांंनी दिले.पुणे शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहेत.कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित (एआय) कॅमेरे बसल्यास गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे अशी माहिती कदम यांनी दिली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार,विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या.