कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार

मंदिरात देवदर्शनाला गेल्यावर प्रत्येकजण आप-आपल्या श्रद्धेनुसार दान करत असतो व दान पेटीत काहीना काही टाकत असतो.काहीजण पैसे टाकतात तर काहीजण सोने-चांदीसुद्धा दान करतात यानंतर आपण जे देवाला अर्पण केले ते देवाचे झाले असे म्हणतात.सामान्यतः मंदिराच्या दानपेटीत लोक पैसे आणि मौल्यवान वस्तू टाकतात पण यावेळी २० रुपयांच्या नोटेवर लिहिलेला मेसेज पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.ही नोट मंदिर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.लोकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सून आणि सासूमध्ये ‘तू तू मैं मैं’ होत असते मात्र एका व्यक्तीनं ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे’ असे २० रूपयाच्या नोटीवर लिहून दानपेटीत दान केले आहे. मंदिरातील दान पेटी उघडल्यानंतर ही २० रूपयांची नोट सापडली.२० रूपयांच्या नोटेवर लिहलेली ही गोष्ट पाहून अनेकांनी आश्चर्य तर व्यक्त केलेच सोबत मंदिर व्यवस्थापनाला देखील धक्का बसला आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे.कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती.दानपेटीत २० रूपये सापडले.२० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे रे देवा’ असे लिहिलेले आढळले.भाग्यवंती मंदिरातील दानपेटीतील रक्कमेची दर महिन्याला मोजणी होते.मंदिराची दानपेटी उघडून नोटा मोजल्या गेल्या तसेच किती तोळे सोने-चांदी दान करण्यात आले याची माहिती देण्यात येते.भाग्यवंती मंदिर हे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर व या मंदिरात भावीक लाखो रूपये आणि दागिने दान करतात पण या सगळ्यात २० रूपये नोटाची चर्चा होत आहे ज्यात एका व्यक्तीने आपल्या सासूचा मृत्यू होवो असे जणू साकडे देवीकडे घातले आहे.

पाहा फोटो

लोक मंदिराच्या दानपटीत भक्तीने काहीना काही टाकत असतात.काहीजण पैसे टाकतात तर काहीजण सोने-चांदीसुद्धा दान करतात यानंतर आपण जे देवाला अर्पण केले ते देवाचे झाले असे म्हणतात.काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधील एका भाविकासोबत विचित्र घडले.आता तुम्ही विचार करा या दानपेटीत तुमची एखादी मौल्यवान वस्तू चुकून पडली तर… तामिळनाडूमधील एका भाविकासोबत असेच घडले.त्याचा आयफोन चुकून दानपेटीत पडला आणि तो देवाचा झाला म्हणत मंदिर प्रशासनाने देण्यास नकार दिला.