बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जानेवारी २५ मंगळवार
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अनेक गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. दरम्यान आता बीडमधील आष्टी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका गावातील मुलीच्या मृत्यूनंतर गावात एक अफवा पसरली आणि या अफवेमुळे गावकऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचे समोर आले आहे.एचआयव्हीमुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती मात्र “आमच्या कुटुंबाबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे” असा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे तसेच या अफवेमुळे पीडित कुटुंबातील एका महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कुटुंबातील एका सदस्याने म्हटले आहे.एचआयव्हीबाबत अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग व पोलिसांचा हात असल्याचा आरोपही या कुटुंबाने केला आहे.दुसऱ्या बाजूला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत तर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचे वृत्त समजताच संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान पीडित कुटुंबातील एक सदस्य व एका अनोळखी व्यक्तीमधील फोनवरील कथित संभाषण टीव्ही ९ मराठीने प्रसारित केले असून यामध्ये अनोळखी व्यक्ती पीडित कुटुंबातील सदस्याला म्हणाली की “तुमच्या मुलीचा एचआयव्ही व कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.डॉक्टरांनी सांगितले की नातेवाईकांना मृतदेहाच्या जवळ जाऊ देऊ नका.मी हे केवळ तुम्हालाच सांगतोय.अत्यंविधीला पाहुण्यांना येऊ देऊ नका असेही डॉक्टरांनी सांगितले होते.