यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी शिवारातील एका शेतकऱ्याच्या बागेत काल दुपारच्या वेळेस शेतात मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आईसोबत असलेल्या ७ वर्षीय बालकाचा बिबटयाने केलेल्या हल्ल्यात अत्यंत दुदैवी असा मृत्यु झाला असुन त्या बालकाच्या कुटुंबीयास महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरीव अशी आर्थिक मदत मिळणार असल्याचे वृत्त वनविभागाच्या विश्वसनिय सुत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,दि.६ मार्च रोजी दुपारच्या वेळेस साकळी तालुका यावलच्या शिवारातील गट ४७२ या केतन सुरेश चौधरी राहणार किनगाव यांच्या मौजे साकळी परिसरातील दुपारी २ ते २,३० वाजेच्या सुमारास शेतबागेत आपल्या मजुरी करणाऱ्या आईसोबत कामास असलेल्या पेमा बुटसिंग बारेला बारेला या सात बालकावर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.सदर घटनेत दुदैवी मरण पावलेल्या ७ वर्षीय बालकाच्या कुटुंबा महाराष्ट्र शासनाच्या वतीने २५ लाख रूपयांची मिळणार असल्याची माहिती यावल ( जळगाव ) वन विभागाचे उप वन सरंक्षक जमीर शेख यांनी दिली असुन त्यातील १o लाख रूपयांची मदत ही शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर देण्यात येणार असुन उर्वरीत ही मरण पावलेल्या बालकाच्या पालकांच्या नांवे सुरक्षीत ठेव म्हणुन ठेवली जाणार असल्याची माहीती उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली आहे.