यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील डांभुर्णी येथील माहेर असलेल्या सुरेखा निंबाजी सोनवणे सरंक्षण अधिकारी अंधेरी -मुंबई यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत व कैलास पगारे (IAS) आयुक्त यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी केलल्या उल्लेखनिय कामासाठी त्यांना हे सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी केलल्या उल्लेखनिय कामासाठी सुरेखा निंबाजी सोनवणे सरंक्षण अधिकारी अंधेरी -मुंबई यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत व कैलास पगारे (IAS) आयुक्त यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.निष्काम सेवा सैदव तुझ्या हातून घडो तसेच लाभार्थी आणि सर्व सामन्यांची प्रामाणिक सेवा केल्याबद्दल सुरेखा निंबाजी सोनवणे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सुरेखा सोनवणे यांचे त्यांच्या माहेरी डांभुर्णी तालुका यावल या गावात व परिसरात तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चव्हाण परिवार व मंदाने (दोंडाईचा)स्वयंदीप परिवार जळगाव तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.