Just another WordPress site

मोहराळा ग्रुप ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी !! भिमआर्मी एकता मिशनची निवेदनाद्वारे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ मार्च २५ बुधवार

तालुक्यातील मोहराळा-हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या १५ वित्त आयोग व ईतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ठ प्रतीच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशा  मागणीचे निवेदन भीम आर्मी एकता मिशनचे गौरव सोनवणे यांच्या वतीने यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे नुकतीच करण्यात आली आहे.

दरम्यान भीम आर्मी एकता मिशनचे गौरव सोनवणे यांनी पंचायत समितीस दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,मौजे ग्रुप ग्रामपंचायत मोहराळा अंतर्गत २०२१ ते २०२३ या कार्यकाळात सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने मिळून १५ व्या वित्त आयोगाचा मिळालेला निधी व ईतर मिळालेल्या शासकीय निधीतुन मोहराळा गावात विविध प्रकारची केलेली सर्व विकास कामे ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची असुन या कामाची त्वरीत चौकशी व ऑडीट करून सरपंच आणी ग्रामसेवक यांच्यावर कायद्याशीर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकारे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव हे काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी भिम आर्मी एकता मिशनच्या वतीने नुकतीच करण्यात आली.दरम्यान सदर मागणी गौरव भरत सोनवणे,फिरोज अब्बास तडवी,राहुल जयकर यांनी केली असुन गटविकास अधिकारी यांनी संपुर्ण भ्रष्ट  कारभाराची चौकशी न केल्यास या गैरकारभारास आपली मुक संमती आहे असे समजुन वरिष्ठ पातळीवर सदर भ्रष्ठाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.