नाशिक-पोलीस नायक:-
नाशिकच्या राजकारणातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे यामध्ये उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाशी जवळीक ओळखून पक्षाला सोडचिठ्ठी करण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकाची हकालपट्टी केली आहे श्याम साबळे असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे.नाशिकमधील अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे पाहून इतरांना धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी सुरु केली आहे.पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक श्याम साबळे यांची ठाकरे गटाने हकालपट्टी केल्याने नाशिकमधील शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.श्याम साबळे यांच्या हकालपट्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
यानंतर प्रवीण तिदमे हे दहा ते बारा माजी नगरसेवक शिंदे गटात सामील करणार असल्याचे समोर आले होते त्यामध्ये श्याम साबळे यांचाही समावेश असल्याची चर्चा रंगली होती.त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपल्याला सुरुंग लावण्याआधीच हकालपट्टीची कारवाई करत सर्वांना धक्का दिला आहे.या हकालपट्टीची घोषणा ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.