भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी आंबेकर व संघटकपदी सैय्यद चाँद बादशा यांची निवड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील हिंगोणा येथील पत्रकार हर्षल आंबेकर यांची तालुका उपाध्यक्ष व मारूळ येथील पत्रकार सैय्यद चॉंद बादशा यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे.सदरील बैठकीदरम्यान त्यांची ही निवड करण्यात आली.याबैठकीत पत्रकारांच्या संर्दभातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी हर्षल आंबेकर व सैय्यद चॉंद बादशा यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सचिव जिवन चौधरी,जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश चौधरी,शहरी जिल्हा अध्यक्ष सलीम पटेल,उत्तर विभागीय अध्यक्ष चंदकात पाटील व उपाध्यक्ष महेश पाटील ,विभागीय समन्वयक रणजीत भालेराव,शहरी क्षेत्राचे उपाध्यक्ष रावण ठाकरे,नरेन्द्र सपकाळे,जिल्हा सचिव गोकुळ कोळी,तालुका अध्यक्ष ए टी चौधरी(पाटील),मनोज नेवे ,बाळासाहेब आढाळे,राजेन्द्र आढाळे,रविद्र आढाळे,सुनिल पिंजारी,नितिन बडगुजर,नितिन झांबरे,फिरोज तडवी,दिपक नेवे,विक्की वानखेडे यांच्यासह बहुसंख्य पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.