मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर अनेक स्थानिक पदाधिकारी,नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यातच आता शिवसेनेच्या आक्रमक नेत्या दीपाली सय्यद या सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार का?अश्या शक्यतांना बळ मिळत आहे.खुद्द दीपाली सय्यद यांनीच वेट अँड वॉच असे म्हणत याबाबत सूचक संकेत दिले आहेत.