पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिद्धाराम हे जेसीबीवर चालक म्हणून काम करीत असत.२९ मार्च रोजी सिद्धाराम सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले व ते परत आले नाहीत.कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडत नसल्याने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धाराम यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला.दरम्यान २ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास मोशी येथील कानिफनाथ मंदिरासमोरील खडी मशिन खाणीमध्ये स्थानिकांना सिद्धाराम यांचा मृतदेह आढळला व त्यांनी तत्काळ पोलिसांना हा प्रकार कळविला.मृतदेहाजवळ सिद्धाराम यांचा मोबाइल सापडल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली मात्र खाणीमध्ये त्यांचे केवळ धड होते व त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच डावा पाय दोन्ही हात शरीरापासून वेगळे करण्यात आले आहेत.आरोपींनी हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत.याबाबत पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.