मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.जवळपास ९६४ कोटींच्या या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आज शिंदे- फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे.भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे यासोबतच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत.३० जून २०२२ पर्यतचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले मोठे निर्णय :-
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क” संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे.
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल ३११ कोटी करण्यात येईल.
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१२५० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्यात येईल.
मराठवाडा,विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे २८०० बचत गट निर्माण करण्यात येणार आहेत यामाध्यमातून १५०० महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे.तसेच ५-जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण आखण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब(अराजपत्रित),गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस,आयबीपीएस घेण्यात येईल व त्या माध्यमातून ७५ हजार पदे भरण्यात येतील असे महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत.