“कर्ज घेता अन पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता,त्या पैशांनी काय करता”? !! कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावले खडेबोल !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता जवळपास चार महिने झाले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप देखील सरकार करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.महायुती मधील भाजपा,शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता सरकार सत्तेत येताच सर्व घोषणा हवेतच विरल्या का ? असा प्रश्न विरोधक व सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागलेली असतांनाच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात मोठे भाष्य करत शेतकऱ्यांनी आपआपले कर्ज भरण्याचे त्यांनी सांगितले यावरून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना खडेबोल सुनावले असून ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता,कर्जमाफीच्या पैशांनी काय करता ?’ असा अजब सवाल करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.