Just another WordPress site

काँग्रेसचे नेते म्हणाले, ‘न’ पासून नराधम आणि ‘अ’ पासून अमानुष !

अनिल बोंडे यांच्या प्रतिक्रियेला काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचे चोख प्रतिउत्तर

दिलीप गणोरकर

अमरावती विभागीय प्रमुख:-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि राम यातील ‘रा’ हा शब्द सारखा असल्याचे म्हटले होते.त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करताहेत असे पटोले यांनी म्हटले होते.त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.राहुल गांधी आणि रावण यांच्यात बरेच साम्य आहे.राहुल गांधी भारत जोडो यात्रा करताना उत्तरेकडून दक्षिणेकडे न जाता दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहेत.प्रभू श्रीरामाने उत्तरेकडून दक्षिणेकडे यात्रा केली होती.विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत असे अनिल बोंडे यांनी म्हटले होते.

अनिल बोंडे यांच्या या टीकेला काँग्रेस पक्षाकडून तात्काळ चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला असून अनिल बोंडे भाजपमध्ये येण्यापूर्वी दिवसा-ढारु ढोसत होते.आता भाजपमध्ये आल्यावर दुपारीही ढोसत आहेत त्यांची वक्तव्य याच गोष्टीची निदर्शक आहेत कशाची तुलना कुठे करायची हे भान त्यांना राहिलेले नाही.’रा’पासून रावण होत असेल तर नरेंद्र मोदी यांच्या ‘न’पासून नराधम होते.अमित शाहा यांच्या ‘अ’ पासून अमानुष पण होते.अनिल बोंडे यांनी यालाही मान्यता द्यायला पाहिजे.भारत जोडो यात्रेमुळे भाजपची चांगलीच तारांबळ झाली आहे म्हणून त्यांची पातळी सुटली आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे.काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.भाई जगताप,काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली.काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून आपणही या यात्रेत सहभागी व्हावे असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले आहे.शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.