Just another WordPress site

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर यांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांनी आज दि.२० रोजी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.शिवसेना भवनात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून संजय घाडीगावकर व ठाण्यातील नेते व पदाधिकारी यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.२०१९ च्या विधानसभेत संजय घाडीगावकर काँग्रेस पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढले होते मात्र त्यांचा पराभव झाला होता.तसेच त्याआधी नगरसेवक म्हणून ते महापालिकेत निवडून आले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी घाडीगावकर यांचा प्रवेश करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.क्लस्टर योजनेतील आणि महापालिकेतील मोठ्या घोटाळ्यांचे आरोप घाडीगावकर यांनी केले होते.

कोण आहेत संजय घाडीगावकर?

वागळे इस्टेट विभाग प्रमुख : भारतीय विद्यार्थी सेना -१९९७ ते १९९९
शाखाप्रमुख : १९९९ ते २००५. ३० जुलै २००५ -प्रभाग प्रमुख -पदाचा राजीनामा
२००७ ते २००९ ठाणे क्लस्टर योजनेचा जनक,क्लस्टर योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा.
२०१२ ते १६ एप्रिल २०१६ -नगरसेवक
२०१५ ते २०१६ -गटनेता काँग्रेस पक्ष,ठाणे महानगरपालिका
२०१६-नगरसेवक पदाचा राजीनामा

२९-०८-२०१६ पोटनिवडणुकीत स्वाती अनिल देशमुख या सामान्य महिलेला सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करून अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आणले.
२०१७ महापालिका संजीव जयस्वाल व एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली त्यांच्या भावासाठी माझा निवडणूक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा २०१९ काँग्रेस उमेदवार म्हणून कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना फक्त ९ दिवसाच्या प्रचारात प्राप्त एकूण मते २९७७५ मिळाली.
ठाणे फर्स्ट संस्था अध्यक्ष.
श्री सह्याद्री सहकारी पतसंस्था मर्यादित लि. ठाणे अध्यक्ष.

असा संजय घाडीगावकर यांचा कार्यकाळ राहिलेला आहे.त्याच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला निश्चितच बळ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.