Just another WordPress site

दिवाळीपूर्वी ७५ हजार तरूणांना नोकऱ्या देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचे गिफ्ट देणार आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार,मोदी देशभरातील ७५००० तरुणांना नोकऱ्या देणार आहेत.विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते.बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देतील.२२ ऑक्टोबर २२ रविवार रोजी  दुपारी ११ वाजता म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.तेव्हा ७५ हजार तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. यादरम्यान संरक्षण मंत्रालय,रेल्वे मंत्रालय,पोस्ट विभाग,गृह मंत्रालय,कामगार आणि रोजगार मंत्रालय,सीआयएसएफ,सीबीआय,कस्टम,बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील.देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात ओडिसाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान,गुजरातचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया,चंदीगडचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर,महाराष्ट्राचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल,राजस्थानचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,तामिळनाडूचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन,उत्तर प्रदेशचे अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे,झारखंडचे अर्जुन मुंडा आणि बिहारचे गिरीराज सिंह हे सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.