Just another WordPress site

योजनांचा लाभ अधिक सुलभपणे व पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ एप्रिल २५ मंगळवार

आदिवासी व वनवासी बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ अधिक सुलभपणे आणि पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल यांच्यातर्फे “https://itdpyawal.in/” विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगावचे आमदार राजू मामा भोळे तसेच पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सदरील योजना हि पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून आणि मा.मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ना.अशोक उईके (आदिवासी विकास मंत्री,महाराष्ट्र राज्य), मा.ना. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री,आदिवासी विभाग) आणि आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.या पोर्टलमध्ये विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये न्यूक्लियस बजेट योजना, आश्रमशाळा विद्यार्थी प्रवेश,ठक्कर बाप्पा योजना,वनहक्क कायदा,प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना,शबरी घरकुल योजना,वनधन योजना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा व वसतिगृह योजना यांचा समावेश आहे.या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आता प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही.अर्ज ऑनलाइन स्वरूपात सादर करता येणार असून अर्जाची स्थितीही लाभार्थ्याला “https://itdpyawal.in/” या पोर्टलद्वारे कळविण्यात येणार आहे.हा उपक्रम डिजिटल युगात आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी म्हटले आहे.सदरहू अधिक माहितीकरिता प्रकल्प कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल येथे संपर्क साधावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.