“आपले गुरुजी” मोहिमेअंतर्गत वर्गात फोटो लावण्यास विविध शिक्षक संघटनांचा विरोध
उद्या २९ ऑगस्ट रोजी सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार
मुंबई- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-राज्यातील शाळांमध्ये “आपले गुरुजी “या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये ए-फोर साइज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याबाबत शासनाच्या वतीने नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.शासन शिक्षकांना वर्गात फोटो लावण्यास सांगून शिक्षकांवर अविश्वास दाखवत आहेत.व त्यांना अपमानित करीत आहेत.यात सदरील निर्णय शासनाने मागे घेतला नाही तर शिक्षक संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला असून उद्या दि.२९ ऑगस्ट २२राजी सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे भारती शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी २४ ऑगस्ट २२ रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना यांनी शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश दिलेले आहेत.तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते.सदरील दोन्ही घटना या समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत शासन पातळीवर शिक्षकांना जाणीवपूर्वक बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी ठोस कृती कार्मक्रम देण्याची गरज असतांना शासन शिक्षकांचे खच्चीकरण करीत आहे.राज्यात बहुतेक ठिकाणी ग्रेडेड मुख्याध्यापक नसल्यामुळे सिनियारीटी शिक्षकाला वर्गातील मुलांना शिकविण्यासोबतच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकांची परिपूर्णता करण्यातच वेळ घालवावा लागत आहे .परिणामी वर्गातील विद्यार्थ्यांकडे सिनियारीटी शिक्षकाला वेळच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.यात विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादून शिक्षकांचा वेळ वर्गात शिकविण्यापेक्षा इतर कामांकडे कसा जाईल व शैक्षणिक दर्जा राखण्यात शिक्षक अपयशी ठरले तर त्याचे खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडून अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा घाट शासनाने सुरु केला आहे.असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राज्यातील शाळांमध्ये ‘आपले गुरुजी ‘या उपक्रमाअंतर्गत शाळेत शिक्षकाचा फोटो लावणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखून अपमानीत करणे हि शासनाचे धोरण असून शासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.त्याच्याच निषेधार्थ राज्यातील सर्व शिक्षक हे उद्या दि.२९ ऑगस्ट २२ रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहे.याबाबतच्या प्रति मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री दिपक केसरकर व रणजित सिह देओल अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र यांना पाठविण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,सरचिटणीस भरत शेलार,कोषाध्यक्ष किशोर कदम,उपाध्यक्ष विनोद कडव,बबन गावडे,दया नाईक,संजय म्हस्के,प्रकाश ब्राम्हणकर,महिला अध्यक्ष स्वाती बेंडभर,सह सरचिटणीस जानकीराम घाडगे,संपर्क प्रमुख संतोष ताठे,राज्य सदस्य शिवाजी खुडे,प्रसिद्धी प्रमुख पप्पु मुलाणी,चिमणाजी दळवी,दीपक पाटील,सुनील चिपाटे,प्रवक्ते सतीश रावजादे,सतीश हुले,संघटक किशोर कुमावत,सतीश ढेरे,दशरत गावडे,जळगाव विभाग अध्यक्ष सोमनाथ पाटील ,नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र दिघे,मराठवाडा विभाग अध्यक्ष संजय बुचडे,अमरावती विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम ठोकळ यांनी दिली आहे.
त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,सरचिटणीस कल्याण लवांडे,कार्याध्यक्ष अण्णाजी आडे,कोषाध्यक्ष विनायश्री पेडणेकर,महिला विभाग प्रमुख भोयर,सल्लागार प्रकाश दळवी,सुरेश भावसार,विश्वनाथ सुर्यवंशी,मराठवाडा विभाग प्रमुख घोगरे,विदर्भ विभाग प्रमुख किरण पाटील,कोकण विभाग प्रमुख प्रमोद पाटील,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख भगवान पाटील,उपाध्यक्ष महेश देशमुख ठाणे,लालासाहेब मगर उस्मानाबाद,रवींद्र सोनवणे जळगाव,परमेश्वर बालकुंदे लातुर,डिगंबर जगताप यवतमाळ,रेखा शेळके हिंगोली,अनिल महाजन पुणे,सुनील जाधव अहमदनगर,उपसरचिटणीस संगीता देव अमरावती,संयुक्त चिटणीस दीपक भुजबळ सातारा,म.ल.देसाई सिंधुदुर्ग,रंजना केणे रायगड,बाळासाहेब ढगे सोलापूर,कृष्णा चिकने रत्नागिरी,दिलीप देवकांबळे नांदेड,स्वप्नील राणे धुळे,डॉ.रवींद्र काकडे जालना,सुनील पेटकर नागपूर,सुनील राठोड लातूर,उर्मिला बोन्डे चंद्रपूर,संघटक वसंत देवरे धुळे,प्रकाश देशमुख वर्धा,प्रशांत पारकर सिंधुदुर्ग,चंद्राकांत मेकाले नांदेड,संजीवनी वाघमारे जालना,राजेंद्र निमसे अहमदनगर,दिवाकर पांगुळ भंडारा,रजनी चव्हाण सातारा व डी.एस.कोल्हे हिंगोली यांनी देखील वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध दशविला असून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे व उद्या दि.२९ रोजी सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्यास पाठिंबा दर्शविला आहे.