पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार !! कोणती घोषणा होणार ? ‘त्या’ निर्णयांमुळे चर्चांना वेग !!
नवी दिल्ली-पोलीस नायक :-
दि.१२ मे २५ सोमवार
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.नरेंद्र मोदी यांनी रात्रीच्या वेळी आठ वाजता देशाला संबोधित करण्याचा एक मोठा इतिहास राहिला असून नरेंद्र मोदी यांनी याआधी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय हा रात्री आठ वाजताच जाहीर केला होता तसेच त्यांनी कोरोना संकट काळातही लॉकडाऊनची घोषणा रात्री आठ वाजताच केली होती त्यामुळे आज रात्रीच्या आठ वाजता नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.भारत-पाकिस्तान तणाव सध्या निवळल्यासारखी स्थिती पाहायला मिळत असून गेल्या आठवड्यात भारताने भयानक काळ बघितला.भारताच्या सीमेभागातील काही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले अर्थात त्यांचे ते सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारताच्या सैन्यदल आणि वायुसेनेने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.पाकिस्तानच्या हल्ल्यात आकाशात ड्रोन बघायला मिळाले पण त्याचा फारसा फरक पडला नाही कारण भारतीय सैन्याकडे असणाऱ्या अत्याधुनिक S400 यंत्रणेने पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त केले याउलट पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे मोठे नुकसान केले.दोन्ही देशांमध्ये सलग चार दिवस टोकाच्या तणावानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला व यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून या सर्व घडामोडींनंतर आता मोठी बातमी समोर येत आहे.यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
दरम्यान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाच्या जनतेला नेमके काय संबोधित करणार आहेत? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला असून मोदी यांनी याआधी जेव्हा रात्री आठ वाजता देशाच्या जनतेला संबोधित केले आहे तेव्हा मोठ्या घोषणा केल्या आहेत मग त्यामध्ये नोटाबंदीची घोषणा असेल किंवा लॉकडाऊनची घोषणा असेल.अशाप्रकारच्या मोठ्या घोषणा नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतानाच केल्या आहेत त्यामुळे त्यांच्या आजच्या संबोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला व या हल्ल्यात भारताच्या २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला व या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची माहिती नंतर समोर आली.भारताचे जवान हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत असून या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध घातले आहेत.यात भारताने सिंधू जल करार रद्द केला तसेच पाकिस्तानच्या नागरिकांना ताबोडतोब देश सोडण्यास सांगण्यात आले या घडामोडींनंतर पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर आणि सीमाभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते.पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात होता व या गोळीबाराला भारतीय लष्काराने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले पण नंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत गेला आणि त्याला युद्धाचे स्वरुप आले पण सुदैवाने आता परिस्थिती निवळली आहे.यानंतर आता मोदी देशाला काय संबोधित करतील ? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.