यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २५ शुक्रवार
यावल शहरापासुन चार किलो मिटर अंतरावर वढोदे गावाजवळ यावल-चोपडा राज्य महामार्गावर काल दि.१६ मे शुक्रवार रोजी एका अज्ञात मोटर वाहनाच्या अपघाताने एकाचा बळी घेतला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारक व चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल-चोपडा राज्यमहामार्गावरील रस्त्यावर यावल शहरापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या बेहडे यांच्या कृषी केन्द्राजवळ दि.१६ मे शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजेच्यापुर्वी अंदाजीत रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात ५० वर्षीय अज्ञात व्यक्तिचा मृत्यु झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच यावल पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अज्ञात व्याक्तीस यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास मयत झाले असल्याचे घोषीत केले.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व अज्ञात चालका विरुद्ध मुकुंद बहादुर बारेला राहणार वढोदे तालुका यावल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिच्या मयतास कारणीभुत म्हणुन अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.