यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २५ गुरुवार
तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत दि.२ जून २०२५ सोमवार रोजी सकाळी १० वाजता श्री खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट सभागृहामध्ये महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महसूल विभाग,पुरवठा विभाग,कृषी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना थेट गावातच राबवल्या जाणार आहेत.
दरम्यान या शिबिरात कुटुंब अर्थसहाय्य योजना,उत्पन्नाचा दाखला,शाळेसाठी दाखला,जात दाखला,राशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्र,PM किसान योजनेसाठी लँड सीडिंग व ई-केवायसी,
दुष्काळी अनुदानासाठी ई-केवायसी नोंदणी,कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया,संजय गांधी योजना ई केवायसी,महिला बालकल्याण विभागाच्या योजना,विविध विभागांचे दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिरात शेतकरी,ग्रामस्थ आणि सर्व नागरिकांसाठी महसूल तसेच विविध शासकीय योजना व सेवा एकाच ठिकाणी देण्यात येणार असून या शिबिरात देण्यात येणाऱ्या विविध सुविधा पुढीलप्रमाणे आहेत.
१.महसूल विभाग- जिवंत ७/१२,ई-फेरफार,ई-हक्क नोंदणी,ई-पिक पाहणी,शेत सुलभ योजना,सलोखा योजना,शिवरस्ते माहिती,जात,उत्पन्न,रहिवासी प्रमाणपत्र,जिवंत ७/१२ टप्पा २ :- अ पा क, एकुक,कालबाह्य नोंदी कमी करणे,
२. कृषी विभाग- पीक विमा योजना,कृषी अनुदाने,खत-बियाणे वितरण,पोकरा गावातील विशेष योजना माहिती पुस्तिका व स्वतंत्र चौकशी कक्ष,
३. पाणीपुरवठा व जलसंधारण विभाग- सिंचन,विहीर मंजुरी,जलयुक्त शिवार,जलसंधारण योजना अंमलबजावणी,
४. पंचायत राज व ग्रामविकास विभाग- गावातील विकासकामे (रस्ते,नाली,अंगणवाडी,स्वच्छता)
५. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- मजुरीचे प्रलंबित प्रकरणे,मंजूर कामांची माहिती
६. आरोग्य विभाग- प्राथमिक आरोग्य केंद्र प्रतिनिधी,आशा वर्कर
७. संजय गांधी विभाग- वृद्ध,विधवा,अपंग निवृत्तीवेतन (ई-केवायसी कॅम्प)
८. महिला व बालकल्याण विभाग- महिला सहाय्यता योजना,बचत गट यांच्यासाठी योजना
९. निवडणूक विभाग- नवीन मतदार नोंदणी,मयत मतदारांचे नाव कमी करणे,नाव व पत्ता बदलणे
१०.माहिती व तंत्रज्ञान विभाग (CSC, Mahaonline)- ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार,मोबाईल लिंकिंग,डिजिटल सेवा,ई-सेवा केंद्र
११. जलजीवन मिशन / पाणी व स्वच्छता विभाग- घरगुती नळजोडणी,गावातील पाणी पुरवठा योजना
१२. ग्रामपंचायत विभाग- घरपट्टी,ड्रेनेज समस्या,नोंदणी,दुकान व लायसन्स संबंधित अडचणी
१३. अपंग कल्याण विभाग (Divyangjan Welfare)- दिव्यांग प्रमाणपत्र,सहाय्य उपकरणे व लाभ योजना
१४. बांधकाम विभाग (PWD/ग्रामविकास अभियंता विभाग)- रस्ते,पूल,अंगणवाड्या,शाळा इमारतींचे काम
१५. जमीन अभिलेख विभाग (Land Records)- सर्वे नंबर,मोजणी प्रकरणे,नवीन मोजणी व सुधारित नकाशे
१६. बँक प्रतिनिधी / जिल्हा अग्रणी बँक / नागरी सहकारी संस्था- शेतकरी कर्ज,PM-KISAN,PMEGP,मुद्रा योजना,KYC,बँक खाते अडचणी
१७. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)-आयुष्मान भारत योजना,आरोग्य कार्ड नोंदणी,तपासणी शिबिर
१८. पुरवठा विभाग-दुय्यम रेशन कार्ड,विभक्त रेशनकार्ड
१९. कायदा व सुव्यवस्था- गावातील पोलिस पाटील व तंटामुक्ती समिती सदस्य यांची उपस्थिती
अशा सर्व सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना एका छत्राखाली मिळणार आहे तरी गावातील सर्व नागरिक,महिला भगिनी,शेतकरी बांधव,युवक आणि युवतींनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बबन काकडे उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख यांनी केले आहे.