यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २५ शनिवार
तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरात गेल्या आठवड्यात पत्नीच्या निधनानंतर तिच्या विरहाने पतीनेही पत्नीच्या पाठोपाठ जगाचा निरोप घेतल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान दि.२१ मे रोजी दहिगाव येथील राहणाऱ्या अंजनाबाई देविदास सुतार वय ५५ यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले.पत्नी आजारी असतांना पतीने आपली जीवनसंगिनी पत्नी हे आजारपण चांगले व्हावे याकरीता देविदास सुतार यांनी आरोग्याची काळजी घेत उपचार करण्याची सर्वोत्यापरी काळजी घेतली पण अखेर तिचे निधन झाले.सदरहू जिवनसाथी पत्नी ही आपल्या आयुष्यातुन निघुन गेल्यानंतर देविदास त्रंबक सुतार वय ७५ आपला संसाराचा गाडा कसा तरी चालवीत असतांना या पत्नीच्या विरहाला पती सुतार यांचे देखील दि.२८ मे रोजी निधन झाले.पती-पत्नी दोघांनी आठच दिवसात जगाचा निरोप घेल्याने गावकऱ्यांना धक्काच बसला असून पत्नीचा आजारपणातुन झालेला मृत्यु हे त्यांच्या मनाला लावुन गेल्याने अखेर दि.२८ रोजी देविदास सुतार यांचा मृत्यु झाला.त्यांच्या पश्चात मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार असून मुलगाही मजुरी करून बाहेरगावी आपला जीवन चरित्र चालवीत आहे.अशा या गरीब कुटुंबावर आठवड्यातच दोघे पती-पत्नीच्या मयत झाल्याने डोंगर कोसळला आहे.