Just another WordPress site

यावल नगर परिषदेवर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात यावी-यावल तालुका शिवसेना शिंदे गटाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जून २५ बुधवार

येथील नगर परिषदेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ व कायमस्वरूपी अधिकारी वर्ग मिळण्यात यावे तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्या असल्या कारणाने त्यांच्या जागेवरती कायम स्वरूपी पाणीपुरवठा अभियंता तात्काळ देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी पाटोळे यांना यावल तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.

दरम्यान नगर परिषदेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ व कायमस्वरूपी अधिकारी वर्ग मिळण्यात यावे तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्या असल्या कारणाने त्यांच्या जागेवरती कायम स्वरूपी पाणीपुरवठा अभियंता तात्काळ देण्यात यावे त्याचबरोबर यावल नगर परिषदेमध्ये सत्यम पाटील यांना पुन्हा कुठल्याही स्थितीमध्ये पदभार व कुठलीही जबाबदारी देण्यात देऊ नये कारण त्याच्याविरुद्ध जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला असून मागील काळामध्ये सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे त्यांच्याकडे लेखी स्वरूपात पुराव्यानिशी तक्रार केलेली आहे.त्या अनुषंगाने यावल नगर परिषदेत त्याला कुठल्याही परिस्थिती मध्ये कोणत्याही पदावरती त्याला जबाबदारी देण्यात येऊ नये जर आपण तशी चूक केली तर आपल्याला जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल याची आपण गांभीर्याने दक्षता घ्यावी.जर आपण त्याची पद स्थापना केली यावल नगरपरिषदेत कुठल्याही पदावर तर शिवसेनेच्या आणि युवा सेनेच्या वतीने वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे.यावेळी शिवसेना युवा तालुकाध्यक्ष अजय तायडे,शिवसेना उपजिल्हा संघटक नितीन सोनार,शिवसेना यावल शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे,शिवसेना यावल शहर उपाध्यक्ष राजू सपकाळे हे याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.