Just another WordPress site

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०७ जुन २५ शुक्रवार

आश्वासन समिती अध्यक्ष यांचे निर्देशांनुसार हिंगोली येथील नऊ बारचालक,ढाबामालक व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी पोलिस स्टेशन येथे एफ आय आर क्र.०३१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई येथील कचरा डंपिंग जाळणे,पोयसर,मिठी नदीमध्ये केमिकल पाणी सोडणे याबाबत पर्यावरण समिती रिपोर्ट मागवा असे निर्देश आश्वासन समितीमध्ये दिले.यावेळी पंढरपूर आषाढी एकादशी विठुरायाचे दर्शनासाठी पालखी मार्ग व्यवस्था सुख सुविधा संबंधी समितीत चर्चा करण्यात आली.तर संभाजीनगर येथील २११ सफाई कामगारांना नोकरी प्रकरणात अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली.

विधानभवनात २० माळ्यावर समितीच्या सभागृहात आश्वासन समतीची बैठक समिती प्रमुख आमदार रवि राणा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.सदर  समितीमध्ये हिंगोली येथील ९ बार रेस्टॉरंट मालक,ढाबा मालक तसेच हॉटेल मालक यांच्यावर अनधिकृतपणे पाणी चोर प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले अशी लेखी माहिती तेथील जिल्हा प्रशासनचे वतीने अध्यक्ष यांना लेखी दिली.परिणामी त्यांचेवर एफ आय आर क्रमांक.०३१० अन्वये ३७९,४२७,३४,३,२९८गुन्हे दाखल करण्यात आला असून अनेक प्रकरणात पर्यावरण समिती विभागाकडून रिपोर्ट मागितला आहे तसेच तो रिपोर्ट घेऊन त्या त्या विषयावर प्रधान सचिव,आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहावे असे निर्देश सदर बैठकीत अध्यक्ष आ.रवी राणा यांनी दिले.या बैठकीत पंढरपूर आषाढी एकादशी विठुरायाचे दर्शनासाठी पालखी मार्ग व्यवस्था,सुख सुविधा संबंधी चर्चा झाली.तसेच महाराष्ट्रामध्ये ३३ कोटी वृक्ष रोपण केले त्याबद्दल जिल्हा निहाय वृक्षारोपण केले त्याची सविस्तर माहिती समिती ठेवण्याबाबत आदेश याबाबत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले.

सदरील बैठकीस आमदार राजेश पवार,आमदार हिरामण खोतकर,आमदार सरदेसाई,आमदार विक्रम पाचपुते,आमदार अनुप अग्रवाल,आयुक्त जालना मनपा S.M खांडेकर,आयुक्त सांगली मनपा सत्यम गांधी,नगर विकास सह सचिव विद्या हंपया,सहसचिव सुलेखा वैजापूरकर,विजय चौधरी,उप सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, उप सचिव जवळीकर,उप सचिव अजिंक्य बगडे,उप सचिव सुलभा पवार,अवर सचिव अनिल राणे,मुख्य अधिकारी परळी वैजनाथ त्रंबक कांबळे,मुख्य अधिकारी पातूर जिल्हा अकोला सैय्यद,मुख्य अधिकारी हिंगोली अरविंद मुंडे,मुख्य अधिकारी ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर अर्शिका जुही,मुख्य अभियंता सिडको दि.र हरताळ, DMC SMKC साबळे,कर सहायक आयुक्त पुणे मनपा खराडे,मुख अभियंता मनपा श्रीकर चौधरी,CE मेट्रो MMRDA विकास नाईक,SE मेट्रो MMRDA P D जमदार,सह सचिव नारायण थिटे,कक्ष अधिकारी म्हात्रे तसेच राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्याधिकारी,उप जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.