होबार्ट-पोलीस नायक(क्रीडासेवा)
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-१२ मधील सर्व संघ निश्चित झाले आहेत.झिम्बाब्वे हा सुपर-१२ मध्ये दाखल होणारा अखेरचा संघ ठरला आहे.क्रेग इर्विगच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा ५ विकेटनी पराभव करून सुपर-१२ मध्ये प्रवेश केला.याआधी श्रीलंका,नेदरलँड आणि आयलँड यांनी पात्रता फेरीत विजय मिळून मुख्य फेरीत प्रवेश केला होता.या चार संघातील दोन संघ भारताच्या ग्रुपमध्ये आले आहेत.श्रीलंका आणि स्कॉडलँड यांना ग्रुप-१ मध्ये तर भारताचा समावेश असलेल्या ग्रुप-२ मध्ये झिम्बाब्वे आणि नेदरलँड यांनी स्थान पक्के केले.यामुळे आता भारताची ६ नोव्हेंबर रोजी मेलबर्न मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध लढत होणार आहे.तर नेदरलँडविरुद्ध २७ ऑक्टोबर रोजी लढत होईल.
सुपर १२ संघ पुढीलप्रमाणे आहेत.
ग्रुप-१:-इंग्लंड,ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,अफगाणिस्तान,श्रीलंका आणि स्कॉटलँड
ग्रुप-२:-भारत,पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका,बांगलादेश,नेदरलँड आणि झिम्बाब्वे
टी-२० वर्ल्डकप ३ स्टेजमध्ये होत आहे.पहिला राउंड १ म्हणजेच पात्रता फेरी,सुपर १२ आणि प्लेऑफच्या लढतींचा समावेश आहे.स्पर्धेत १६ संघापैकी ८ संघांनी थेट सुपर-१२ मध्ये प्रवेश केला अन्य ४ संघ पात्रता फेरीतून सुपर १२ मध्ये दाखल झाले.
भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.ही लढत २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होईल.
असे आहे भारताचे वेळापत्रक…
२३ ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध, मेलबर्न दुपारी १.३० वाजता
२७ ऑक्टोबर- नेदरलँडविरुद्ध, सिडनी, दुपारी १२.४० वाजता
३० ऑक्टोबर-दक्षिण आफ्रिका, पर्थ, दुपारी १.३० वाजता
०२ नोव्हेबर- बांगलादेशविरुद्ध, एडिलेड, दुपारी १.३० वाजता
०६ नोव्हेंबर- झिम्बाब्वेविरुद्ध, मेलबर्न, दुपारी १.३० वाजता