विशाखापट्टणम-पोलीस नायक(क्रीडासेवा):-
क्रीडाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा सुरु आहेत. त्यात ज्युनियर क्रिकेटपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे.यादरम्यान एका महिला क्रिकेट संघाच्या बसचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अपघात झाला आहे.या अपघातात मॅनेजरसह ५ जण जखमी झाले आहेत.बडोदा सिनियर महिला क्रिकेट संघ विशाखापट्टणमध्ये सामना खेळून परत बडोद्याला येत होता.त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर संघाच्या बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की बसमधील ४ खेळाडू आणि मॅनेजर नीलम गुप्ता यांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात आज दि.२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला.या महिला टीमच्या बससमोर असलेल्या एका कारचालकाने हायवेवर अचानक ब्रेक दाबला.त्यावेळी ज्या बसमधून महिला क्रिकेटर प्रवास करत होते त्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.जखमी झालेल्या बडोद्याच्या खेळाडूंमध्ये केशा पटेल,अमृता जोसेफ,प्रग्या रावत आणि निधी धुमानिया यांचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.