यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील सावखेडा सिम गायरान रस्त्यावर असलेल्या निंबादेवी धरणास बघून आपल्या गावाकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांचा भिषण अपघात होऊन यात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
दरम्यान अकलूज येथील मयत विजय शिवा भिल वय १७ वर्ष व कृष्णा गजानन पवार राहणार अकलूज आणि मयूर सुधाकर सोनवणे २१ वर्ष राहणार वाघळूद तालुका पावल हे तिघ मिळून शाहीन या मोटरसायकलने निंबादेवी धरण बघण्यासाठी गेले होते.धरण बघून यावल तालुक्यातील अकलूज येथे जात असतांना सावखेडा सिम गायरान रस्त्याच्या वळणावर मोटर सायकलवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली व या झालेल्या भिषण अपघातात मोटरसायकलचे दोन तुकडे होऊन विजय शिवा भिल वय १७ वर्ष हा तरूण जागीच मरण पावला असून त्यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात घालवण्यात आले तर अपघातात गंभीर जख्मी झालेले मयूर सुधाकर सोनवणे आणि कृष्णा गजानन पवार यांना डॉ.तुषार सोनवणे यांनी उपचार करून जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थी हलवण्यात आले आहे.निंबादेवी धरणा परिसरात एकाच आठवड्यात दोन जणांचा वेगवेगळ्या घटनेत मरण पावल्याची घटना घडल्या आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.