यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जुलै २५ शनिवार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात देश रक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या गौरवासाठी “एक राखी सैनिको के नाम” हा अनोखा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात आला.सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात व सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित व सुखाने जीवन जगत आहोत त्यांच्या रक्षणासाठी रक्षाबंधन हा उपक्रम महाविद्यालयात घेण्यात आला तसेच रक्षाबंधन हा एक महत्त्वपूर्ण सण असून या सणाचे महत्व लक्षात घेऊन भाऊ-बहिण बंधनाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयातून सरहद्दीवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे होत्या.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक-भगिनी यांनी आपल्या स्वखर्चातून आणलेल्या राख्या जमा करण्यात आल्या.सदर जमा झालेल्या राख्या शिक्षक भगिनी तसेच विद्यार्थिनी यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य संध्या सोनवणे यांच्या हस्ते त्रिपुरा येथील सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील (असिस्टंट सब-इन्स्पेक्टर क्लर्क) यांच्याकडे सैनिकांसाठी सुपूर्त करण्यात आल्या.यावेळी महेंद्र पाटील यांनी आपल्या भावूक मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली हा अनोखा व स्तूत्य उपक्रम आहे.बऱ्याच सैनिकांना बहिणी नसतात व काही सैनिकांपर्यंत राख्या पोहोचत नाही.सदर राख्या मी व्यक्तिगत भेटून सैनिकांना देईन व आपल्या भावना सैनिकांपर्यंत पोचवेल अशी ग्वाही दिली.हा नावीन्य उपक्रम आहे अशा भावूक-भावना व्यक्त केल्या.यावेळी सीमा सुरक्षा बलचे उपनिरीक्षण महेंद्र पाटील यांचे हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.व्ही.रावते यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा.मनोज पाटील डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.संजीव कदम,प्रा.संदीप मोरे,प्रा.सोनाली पाटील,मिलिंद बोरघडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.