यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील बामणोद,आमोदा,विरोदा,म्हैसवाडी येथील महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडे वाटप कार्यक्रम रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांनी विविध कार्यकारी सहकारी संस्था बामणोद येथे मागील महिन्यात केवायसी ज्यांनी केली होती त्यांना भांडी वाटप कार्यक्रम करण्यात आला.यामध्ये जवळपास ३३१ नोंदणी केलेल्यांनी लाभ घेतला व त्यांना मान्यवरांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य हिरालाल चौधरी,जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शरद महाजन,बामणोद न्हावी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे,माजी पंचायत समिती सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे,माजी पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी,भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश बेंडाळे,भाजप जयश्री चौधरी महिला आघाडी तालुकाध्यक्ष यावल,सागर महाजन,नरेंद्र चौधरी,उमेश पाटील,सतीश चौधरी,म्हैसवाडी सरपंच सुजित चौधरी,मच्छिंद्र चौधरी,अनंत फेगडे,लताबाई मेढे,प्रल्हाद केदारे,प्रशांत सरोदे,दीपक नेहते,चंद्रकांत तळले,दिनकर भंगाळे,हेमंत वारके,उमेश युवराज वाघुळदे प्रामुख्याने या कार्यक्रमास उपस्थित होते.