Just another WordPress site

पाल अभयारण्यात दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारीपदी शीतल नगराळे यांची नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१२ जुलै २५ शनिवार

चाळीसगाव,धुळे आणि करमाळा येथे वनक्षेत्रपाल म्हणून यशस्वी कार्य करणाऱ्या शीतल नगराळे यांनी आता यावल विभागाच्या पाल या वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रूजु झाल्या आहेत. मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेल्या पाल वन्यजीव अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन नियुक्तीमुळे वनसंवर्धन आणि वनगुन्हे प्रतिबंध कार्याला नवे बळ मिळाले आहे.

शीतल नगराळे यांनी यापूर्वी अनेक गुन्हे उघडकीस आणून प्रभावी कारवाई केली आहे.नुकतीच त्यांनी हरणांची शिकार आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध यशस्वी कारवाई करत काही हरणांचे मृतदेह जप्त केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.सध्या त्या वनगुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करत वनविभागाच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत.एक महिला अधिकारी म्हणून त्यांची वन जमिनीवरील अतिक्रमण तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षण या मुद्द्यांवरील भूमिका ठाम आणि सकारात्मक आहे.माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या समस्यांवर उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.शीतल नगराळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे पाल वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात वनसंवर्धन आणि वन्यजीव रक्षण अधिक प्रभावीपणे पार पाडले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.