यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जुलै २५ शनिवार
तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीत नवनियुक्त तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या नेतत्वाखाली निवड झालेल्या काँग्रेस कमेटीच्या तालुका कार्यकारणीत ग्रामीण ब्लॉक सरचिटणीस पदी मारूळचे कार्यकर्ते मसरूर अली मोहम्मद अली यांची तर चिटणीसपदी मतीऊर रहेमान यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
दरम्यान राज्य कॉंग्रेस कमेटी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या आदेशाने व माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या शिफारीसीने मारूळ येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले मसरूर अली मोहम्मद अली यांची यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या कार्यकारणीत सरचिटणीसपदी तर मतीउर्र रहेमान पिरजादे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार रमेश चौधरी,काँग्रेसचे युवा नेतृत्व धनंजय चौधरी,मारूळचे माजी सरपंच जावेद अली जनाब,मारूळचे लोकनियुक्त सरपंच सैय्यद असद अली,प्रदेश कमेटी सदस्य उमेश जावळे,हाजी गफ्फार शाह,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हकीम मोहम्मद याकुब,अनिल जंजाळे,अभय महाजन,धिरज कुरकुरे यांच्यासह आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.