जावेद शेख,पोलीस नायक
भडगांव तालुका प्रतिनिधी :-
दि.१९ जुलै २५ शनिवार
येथील अंजली हॉस्पिटलमध्ये आज दि.१९ जुलै शनिवार रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर शिबिरात स्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ.दिव्या सोळुंके यांनी महिलांच्या आरोग्याबाबत येणाऱ्या विविध समस्यासंबंधी शिबिरातील असंख्य महिलांना मार्गदर्शन करत मोफत तपासणी निदान उपचार केले.
दरम्यान सदरील शिबिरात डॉ.दिव्या सोळुंके,योजना पाटील,करीमा खान,संगिता जाधव,सोनाली चौधरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच हॉस्पिटल मधील अद्ययावत उपलब्ध सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करत आरोग्यदायी शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.शिबिरास भडगांव डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन,माऊली फाउंडेशन उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी,संचालिका संगिता जाधव,शेतकरी संघ संचालिका माजी नगरसेविका योजना पाटील,अँग्लो हायस्कूल चेअरमन करीमा खान,सोनाली चौधरी,मनिषा पाटील,माऊली फाउंडेशन व अंजली हॉस्पिटल सहकारी वृंद यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले.यावेळी शहरातील व परिसरातील असंख्य महिलांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.