यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २५ सोमवार
फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ पदाधिकारी निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे यांना जिह्यातील सर्व शासकीय मुख्यालये यावल आणि रावेर तालुक्यांतील शासकीय कार्यालयात
प्रवेश बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत.दरम्यान निलेश उर्फ पिंटू राणे यांनी दि.१६ जुलै २५ रोजी फैजपूर उपविभागीय अधिकारी
बबनराव काकडे यांच्या दालनात असभ्य वर्तन केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती व या घटनेचे तीव्र पडसाद रावेर व यावल तालुक्यात उमटले होते.यात रावेर व यावल तालुक्यातील तहसील कार्यालय व सेतू कार्यालय बंद तसेच पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत कारवाई करण्याबाबत मागणी करण्याच्या घटना घडल्या असून सदरील विषय जिल्हावासियांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान प्रांताधिकारी यांच्या दालनातील असभ्य घटनेआधीही निलेश रा णे यांनी दि.१५ जुलै रोजी सायंकाळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चुकीच्या प्रकारे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.सदरहू सदरील प्रकारांबाबत जिल्हापरिषद व महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.सदरहू या घटनेची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने एक आदेश जारी करीत निलेश मुरलीधर राणे रा.फैजपूर यांना जिह्यातील सर्व शासकीय मुख्यालये आणि रावेर व यावल तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दि.१९ जुलै ते १६ सप्टेंबर २०२५ या किमान दोन महिन्याच्या कालावधीत प्रवेश करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.सदर कालावधीत ते कोणत्याही तक्रारी फक्त ऑनलाईन करू शकणार असून कोणत्याही सुनावणी दरम्यान ते दूरध्वनी प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकणार आहेत तसेच या कालावधीत ते कोणत्या निवडणुकीत निवडणूक लढविणार असतील तर त्यांना सदर निवणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली असून त्याकरिता त्यांना केवळ एक तास हजर राहण्याची मुदत देण्यात आलेली असल्याचे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.दरम्यान या संदर्भात निलेश उर्फ पिंटू राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी एक लोक प्रतिनिधी असून जनतेच्या कामांसाठी मला नेहमी शासकीय कार्यालयांमध्ये हे जावेच लागते.परिणामी आगामी मधुकर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मी निवडणूक लढणार असून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय संविधानिक नसून माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.